Erhältlich:
Nicht auf Lager
Buch (Softcover): Belletristik
Vivekwel
Verlag:
Repro India Unsere-Artikel-Nr.: P36590187
EAN: 9788119311088
Erhältlich:
Nicht auf Lager
Zustellung: Fr, 25.09.2026
Versand: Kostenlos
CHF 56.50
Beschreibung
'विवेकवेल' हे वसंत गायकवाड यांचे एक पारदर्शी, प्रांजळ आत्मचरित्र आहे. शिक्षणखात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांच्या आयुष्याचा बारकाव्याने आढावा त्यांनी घेतला आहे. त्यांच्या जगण्यातला 'विवेक' यात त्यांनी सोप्या आणि वाचनीय भाषेत मांडला आहे. प्रतिकूल परिस्थितीत, गरिबीत त्यांनी तग धरून स्वतःची विवेकी पायवाट कशी निर्माण केली हे सांगणारे हे आत्मकथन आहे. या आत्मचारित्राची एकूण नऊ प्रकरणात विभागणी केली आहे. बालपण, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, कुटुंब, आई-वडील, भावंडं नात्यांची वीण, मित्रमंडळी, विविध व्यक्तिरेखा आणि प्रसंग, घटना इत्यादींचे यथार्थ वर्णन लेखक वसंत गायकवाड यांनी केलं आहे. लेखकाविषयी वसंत मार्तंड गायकवाड हे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग -२ (प्रशासन शाखा) या संवर्गात त्यांची १९८३ मध्ये निवड झाली. २०१२ मध्ये ते शिक्षण उपसंचालक या पदावरून सेवानिवृत्त झाले. 'विवेकवेल' हे त्यांनी लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र असून हे त्यांचे पहिलेच पुस्तक आहे.
Spezifikationen
Sprache
Autor
- Vasant Martand Gaikwad
Erscheinungsjahr
- 2023
Format
- Buch (Softcover)
Anzahl Seiten
- 362